-
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंचं जोरदार कौतुक होत आहे. या विजयात खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचाही मोलाचा वाटा आहे. यासह संघ निवडकर्त्यांनीही भूमिका अतिशय महत्वाची असते. दरम्यान वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणारे निवडकर्ते कोण? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
बीसीसीआयने अजित आगरकरांची मुख्य निवडकर्ते म्हणून निवड केली आहे. अजित आगरकरांनी आपल्या कारकिर्दीदरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले. काही निर्णय पटले, तर काही निर्णय अनेकांना खटकले. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू आर.पी. सिंगदेखील निवड समितीचा भाग आहे. इशान किशनला संघात परत आणण्यात आर.पी.सिंग आणि प्रज्ञान ओझा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा देखील भारतीय संघाच्या निवड समितीचा भाग आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू शिव सुंदर दास देखील निवड समीतीचा भाग आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अजय रात्रा यांनी २००२ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना भारतीय वनडे संघात पदार्पण केलं होतं. सध्या ते निवड समितीचा भाग आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
९ नोव्हेंबर पंचांग : सोमवती अमावस्येचा खास योग! महादेवाच्या कृपेने ५ राशींचे उजळेल भाग्य; वाचा तुमच्या राशीचे राशिभविष्य