-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं आणि जेतेपदाचा मान पटकावला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
याआधी कुठल्याही संघाला मायदेशात झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवता आला नव्हता. पण भारतीय संघाने हे करून दाखवलं आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय संघाने २०२४ नंतर आता २०२६ मध्ये लागोपाठ २ वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्या आहेत. पुढील टी-२० वर्ल्डकप स्पर्धा २०२८ मध्ये होणार आहे. ही स्पर्धा जिंकून भारतीय संघ जेतेपदाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान ही स्पर्धा केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२८ स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेचे आयोजन २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२८ या कालावधीत केले जाणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेतील सामने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, सिडनी क्रिकेट ग्राऊंड, अॅडलेडमध्ये खेळवले जाऊ शकतात. तर न्यूझीलंडमध्ये होणारे सामने इडेन पार्क, स्काय स्टेडियम, आणि ओव्हलच्या मैदानावर खेळवले जाऊ शकतात. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले