-
भारतीय संघाने मायदेशात टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मोठा पराक्रम केला. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर चाहत्यांसह खेळाडूंच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
-
टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर आपल्या कुटुंबासह भारताच्या या वर्ल्डकप विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसले. या सेलिब्रेशनदरम्यान इशान किशन व त्याच्या कथित गर्लफ्रेंडने सर्वांचं लक्ष वेधलं.
-
भारताच्या विजयानंतर, इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती मैदानावर आली आणि तिने त्याला मिठी मारून अभिनंदन केलं. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
टी-२० विश्वचषक २०२६ चं भारताने जिंकल्यानंतर इशान किशन त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडियासह सेलिब्रेशन करताना दिसला होता. इशान त्याच्या गर्लफ्रेंडसोबत इतक्या उघडपणे दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
इशान किशनपेक्षा त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया मोठी आहे. त्यांच्या वयात दीड वर्षांचा फरक आहे.
-
इशान किशनचा जन्म १८ जुलै १९९८ रोजी पटना येथे झाला आणि तो २७ वर्षांचा आहे. येत्या २८ जुलै २०२६ला २८ वर्षांचा होईल.
-
तर आदितीचा जन्म १५ जानेवारी १९९७ रोजी झाला आणि सध्या ती २९ वर्षांची आहे. अदिती ही राजस्थानमधील जयपूरमधून असून ती पेशाने मॉडेल आहे.
-
आदिती फेमिना मिस इंडिया २०१७ मध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती आणि तिने मिस दिवा सुपरनॅशनल २०१८ चा किताब जिंकला होता. आदितीचा लेबल आदिती हुंडिया नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे.(फोटो सौजन्य-@Ishankishan & @aditihundia Instagram)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव