-
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६चा ब्रँड अम्बेसेडर रोहित शर्मा विश्वचषकानंतर कुटुंबाबरोबर मालदीवला फिरायला गेला आहे.
-
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह वेळ घालवत आहे. या सहलीचे फोटो हिटमॅन व रितिका सजदेहने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मालदीव सहलीदरम्यान रोहित त्याच्या कुटुंबासह कसा वेळ घालवत आहे, याची झलकही त्याने फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले.
-
रोहित शर्माने गेल्या काही काळात आपल्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेतली आहे. फिटमॅन रोहित शर्माने त्याचा फिटनेस दाखवणारा एक फोटो शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला.
-
रोहित शर्माने या ट्रीपदरम्यान पत्नी रितिका सजदेहबरोबर छान सूर्यास्त होत असतानाचा एक सेल्फी शेअर केला आहे.
-
रोहितची लेक समायरा समुद्राकडे पाहत अथांग पसरलेल्या समुद्राचा आनंद घेतानाचा फोटोही यामध्ये आहे.
-
रोहित शर्माने मालदीवचं सौंदर्य दाखवणारा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमधील बॅकग्राऊंडकडे रोहितने सर्वांचं लक्ष वेधलं.
-
रोहित-रितिका व कुटुंबिय अनेकदा सहलीसाठी मालदीवला भेट देतात. रितिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समायरासह वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटत आहे.
-
रोहित शर्माने या सहलीदरम्यानचा कुटुंबाचा गोड फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित पत्नी रितिकासह समायरा व अहान त्यांच्या गोड मुलांसोबत समुद्राकडे पाहत बसले आहेत.(फोटो सौजन्य-@RohitSharma @RitikaSajdeh Instagram)
UPSC परिक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या; मात्र सत्य समोर येताच सर्वांना बसला धक्का