-
भारतीय संघाने टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये जागतिक स्तरावर आपला दबदबा तयार केला आहे. बीसीसीआयने भारताच्या या ६ विजेत्या संघांना एकूण तब्बल ३७६.५ कोटी दिले आहेत.
-
२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद पटकावलं. यावेळेस बीसीसीआयने १२४ कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.
-
भारताच्या अंडर-१९ महिला संघाने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या अंडर-१९ महिला विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. तेव्हा बीसीसीआयने ५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.
-
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं जेतेपद पटकावलं होतं. त्यावेळेस बीसीसीआयने ५८ कोटी बक्षीसाची रक्कम दिली होती.
-
पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या महिला संघाला बीसीसीआयने ५१ कोटी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. भारताच्या महिला वनडे संघाने मायदेशात झालेल्या विश्वचषक २०२५चं जेतेपद पटकावलं होतं.
-
भारताच्या पुरूष अंडर-१९ संघाने २०२६मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं. संघाच्या या शानदार विजयानंतर बीसीसीआयने ७.५ कोटी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती.
-
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ चं विक्रमी तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने तिजोरी उघडत सर्वाधिक १३१ कोटी रूपयांचं बक्षीस जाहीर केलं. (फोटो सौजन्य-इंडियन्स एक्सप्रेस लोकसत्ता संग्रहित फोटो)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव