-
आयपीएल २०२६ च्या हंगामाचा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या मोसमातही काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. तर तेच जुने आणि अनुभवी खेळाडूही मैदानावर उतरणार आहेत.
-
आयपीएल २०२६ मध्ये एकूण १० संघ सहभागी होणार असून या १० संघांमध्ये ७४ गट टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. १० संघांमध्ये फक्त ४ असे खेळाडू आहेत, ज्यांनी सर्व सीझन खेळले आहेत आणि अजूनही या स्पर्धेत खेळत आहेत.
-
२००८ पासून ते २०२६ पर्यंत आयपीएलमध्ये अनेक नवे खेळाडू आले आणि गेले. पण या स्पर्धेत आपल्या कामगिरीचा दबदबा राखणारे असे ४ चेहरे आहेत ज्यांनी आतापर्यंतचे सर्व १८ सीझन खेळले आहेत. हे चारही खेळाडू भारतीय आहेत.
-
विराट कोहली-आरसीबीची ओळख ज्या खेळाडूच्या नावे आहे तो विराट कोहली गेली १९ वर्षे सातत्याने या एकाच संघाचा भाग होता. अखेर १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०२५ मध्ये संघ या स्पर्धेचा विजेता ठरला. विराटला पहिल्याच लिलावात आरसीबीने खरेदी केल्यानंतर त्याला अजूनही संघात कायम ठेवलं आहे.
-
रोहित शर्मा-मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या ५ ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मादेखील सर्व सीझन खेळला आहे. रोहित डेक्कन चार्जर्स संघातून आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली. २०११ मध्ये रोहितला मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं. रोहित शर्माच्या नावे आयपीएलमध्ये एकूण ६ ट्रॉफी आहेत.
-
एस एस धोनी-कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला ५ वेळा स्पर्धेचं जेतेपद पटकावून दिलं आहे. चाळीशी पार केलेला धोनी संघासाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे. २०२३ मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाला होता. चेन्नई संघाचा खेळाडू असलेला धोनी सीएसकेवरील बंदीमुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता.
-
मनीष पांडे – मनीष पांडेने २००८मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं . आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यंदाही हा खेळाडू केकेआरकडून खेळताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य-लोकसत्ता, एक्सप्रेस संग्रहित फोटो)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?