-
आयपीएल २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी सर्व १० संघांनी तयारीला सुरूवात केली आहे.
-
आयपीएल इतिहासात फार कमी गोलंदाजांनी हॅटट्रिक घेण्याचा केला आहे. सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेणं हे एक खूप कठीण काम आहे.
-
आपीएलच्या १८ हंगामांमध्ये आतापर्यंत केवळ २३ हॅटट्रिक्सची नोंद झाली आहे. यापैकी एक हॅटट्रिक खूपच खास ठरली, ज्यामध्ये एका गोलंदाजाने अवघ्या दोन चेंडूंमध्ये तीन बळी घेऊन हॅटट्रिक पूर्ण केली होती.
-
२ चेंडूत हॅटट्रिक घेण्याचा हा पराक्रम २०१४ मध्ये घडला होता. जो राजस्थान रॉयल्सच्या संघातील खेळाडूच्या नावे आहे.
-
२०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा माजी फिरकीपटू प्रवीण तांबे यांनी दोन लीगल चेंडूंत हॅटट्रिक घेत अनोखा विक्रम केला.
-
प्रवीण तांबे यांनी १६व्या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला, पण मनीष पांडे क्रिजबाहेर गेल्याने त्याला स्टंपिंग करत बाद केलं. यानंतर युसूफ पठाणला क्लीन बोल्ड करत दुसरी विकेट मिळवली आणि तिसऱ्या चेंडूवर रायन टेन डेस्काटेला पायचीत करत हॅटट्रिक साधली.
-
प्रवीण तांबे यांच्या आयपीएल कारकिर्दीला वयाच्या ४१व्या वर्षी सुरुवात झाली. २०१३ ते २०१६ या काळात आयपीएलचा भाग होते. यादरम्यान त्यांनी ३३ सामने खेळून २८ बळी घेतले.(वरील सर्व फोटो-@Rajasthan Royals-X, लोकसत्ता संग्रहित फोटो)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप कंपनीत द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा