-
भारतीय संघातील दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आता एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत. २८ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तर रोहित मुंबईकडून खेळताना दिसेल. दरम्यान आतापर्यंत कसा आहे दोन्ही फलंदाजांचा रेकॉर्ड? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहलीला आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून २६७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर रोहित शर्माला आधी डेक्कन चार्जर्स आणि मग मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्याला एकूण २७० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहलीने २६७ सामन्यातील २५९ डावात फलंदाजी करताना ३९.५४ च्या सरासरीने ८६६१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यादरम्यान त्याने ८ शतक आणि ६३ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर रोहित शर्माला २७२ सामन्यांमध्ये ७०४६ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि ४७ अर्धशतकं झळकावली आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
मुलगी मोठी झाली! प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या ‘पहिल्या पाळी’निमित्त आयोजित केला सोहळा, पाहा Photos