-
येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने होणार आहे. दरम्यान कोण आहेत, या स्पर्धेतील सर्वाधिक सामने गमावणारे संघ? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेत सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वल स्थानी आहे. दिल्लीने २६६ पैकी १४० सामने गमावले आहेत. तर ११८ सामने जिंकले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज संघाने २६३ पैकी १३९ सामने गमावले आहेत. तर ११९ सामने जिंकले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २७१ पैकी १३२ सामने जिंकले असून १३२ सामने गमावले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चौथ्या स्थानी आहे. या संघाने २६५ पैकी १३५ सामने जिंकले असून १२४ सामने गमावले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई इंडियन्सने २७७ पैकी १५१ सामने जिंकले आहेत. तर १२२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा