-
माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी यंदाची ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.
-
सोशल मीडियावर झहीरने चाहत्यांना शुभेच्छा देताना स्वतःचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये झहीर पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक कुर्त्यामध्ये अत्यंत देखणा दिसत आहे.
-
दुसऱ्या एका फोटोत तो आपल्या चिमुकल्याला कडेवर घेऊन मायेने कुरवाळताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये झहीरच्या घराचे शाही टेबलावर सजलेले खास ईदचे पदार्थ लक्ष वेधून घेत आहेत.
-
सागरिका घाटगेने या खास प्रसंगी गडद लाल रंगाचा सुंदर फ्लोरल ड्रेस परिधान केला होता.
-
या जोडीने केवळ ईदच नाही, तर नुकताच गुढीपाडवासुद्धा तितक्याच आनंदाने साजरा केला.
-
गुढीपाडव्याला त्यांनी परंपरेनुसार घरासमोर गुढी उभारली आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सणाचा आनंद लुटला.
-
झहीरने या फोटोंना कॅप्शन देताना सर्वांना ‘ईद मुबारक’ म्हणत मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: झहीर खान/इन्स्टाग्राम)
४ वर्षे अमेरिकेत राहिल्यावर मृणाल दुसानिस कुटुंबासह भारतात का परतली? म्हणाली, “आम्ही मायदेशी आलो कारण…”