-
आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतही फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळू शकतो. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत एकदाही शून्यावर बाद न झालेले फलंदाज? जाणून घ्या. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने आतापर्यंत १४९० धावा केल्या आहेत. तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
रिंकू सिंगने ५६ सामन्यांमध्ये १०६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या अँड्यू सायमंड्सने ३९ सामन्यांमध्ये ९७४ धावा केल्या. यादरम्यान तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही.(फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने २९ सामन्यांमध्ये ७०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
तर जेसन रॉयने २१ सामन्यांमध्ये ६१४ धावा केल्या असून तो एकदाही शून्यावर माघारी परतलेला नाही. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
Pakistan threatens Israel Iran War Tehran attack update | ‘आम्हाला कतार समजू नका, ठोकून काढू’, इराण युद्धादरम्यान पाकिस्तानची इस्रायलला धमकी!