-
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने माघार घेतल्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर बंदी घालण्याची शक्यता असून, यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंवर विविध कारणांमुळे बीसीसीआयने बंदीची कारवाई केली आहे.
-
प्रवीण तांबे – भारत
परदेशी टी-१० लीगमध्ये खेळल्यामुळे बीसीसीआयने प्रवीण तांबे यांच्यावर आयपीएल खेळण्यास बंदी घातली होती. -
स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चेंडू छेडछाड (बॉल टॅम्परिंग) प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी लादली होती. -
ल्यूक पोमर्सबॅक – ऑस्ट्रेलिया
हॉटेलमध्ये एका जोडप्यावर हल्ला केल्याच्या गंभीर आरोपामुळे ल्यूक पोमर्सबॅकला तातडीने निलंबित करण्यात आले होते. -
रवींद्र जडेजा – भारत
करार प्रक्रियेत इतर संघांशी मानधनाबाबत परस्पर चर्चा केल्यामुळे रवींद्र जडेजाला २०१० च्या हंगामातून बाहेर काढले गेले होते. -
हॅरी ब्रूक – इंग्लंड
लिलावानंतर शेवटच्या क्षणी नाव मागे घेतल्याने बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार ब्रूकवर दोन वर्षांची बंदी आहे. -
हरभजन सिंह – भारत
मैदानावर श्रीसंतला कानशिलात लगावल्यामुळे हरभजन सिंहला २००८ च्या संपूर्ण हंगामासाठी प्रतिबंधित करण्यात आले होते. -
डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया
चेंडू छेडछाड प्रकरणातील सहभागामुळे डेव्हिड वॉर्नरला २०१८ च्या आयपीएल हंगामात खेळण्यापासून रोखण्यात आले होते. -
मोहम्मद आसिफ – पाकिस्तान
प्रतिबंधित अमली पदार्थाचे सेवन केल्याचे चाचणीत सिद्ध झाल्यामुळे मोहम्मद आसिफवर एक वर्षाची बंदी घातली गेली होती.
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ