-
रोहित शर्मा : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा २११.२ कोटी रुपयांच्या एकूण कमाईसह या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
-
विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारा विराट कोहली २०९.२ कोटी रुपयांच्या मानधनासह दुसऱ्या स्थानावर असून त्याने एका मोसमासाठी २१ कोटींचा विक्रमी करार केला आहे.
-
महेंद्रसिंग धोनी : चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी १९६.८ कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी असून यंदा तो अनपेक्षितरीत्या केवळ ४ कोटी रुपयांच्या करारावर खेळत आहे.
-
ऋषभ पंत : लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींची मोठी बोली लावल्यामुळे ऋषभ पंतची एकूण कमाई १४४.८ कोटी रुपयांवर पोहोचली असून त्याने मोठी झेप घेतली आहे.
-
रवींद्र जडेजा : राजस्थान रॉयल्समध्ये परतलेल्या रवींद्र जडेजाने १४ कोटींच्या नवीन करारासह आतापर्यंत एकूण १३५ कोटींची कमाई केली आहे.
-
सुनील नरेन : कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी एक्का सुनील नरेन याने आतापर्यंत १२५.२० कोटी रुपयांचे मानधन मिळवून आपले स्थान कायम राखले आहे.
-
श्रेयस अय्यर : पंजाब किंग्सचा भाग बनलेल्या श्रेयस अय्यरची आतापर्यंतची एकूण कमाई १२५.०५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
-
लोकेश राहुल : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील झालेल्या लोकेश राहुलने आजवर १२४.१० कोटी रुपये मानधनापोटी मिळवले आहेत.
-
हार्दिक पंड्या : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या १२२ कोटी रुपयांच्या एकूण कमाईसह या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत आपला दबदबा राखून आहे.
-
सुरेश रैना : क्रिकेटमधून निवृत्त झालेला सुरेश रैना ११०.७४ कोटी रुपयांच्या एकत्रित कमाईसह अजूनही या १० प्रमुख खेळाडूंच्या यादीत आपले स्थान टिकवून आहे.
शरद पोंक्षेंचा भाजपाला इशारा; म्हणाले, “अहंकारात राहू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे १० पक्ष उभे करू शकतो”!