-
भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्मृती निळ्याशार समुद्राच्या पाण्यात निसर्गाचा आनंद घेताना दिसून येत आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील या फोटोंमध्ये ती अत्यंत स्टायलिश आणि कूल लूकमध्ये दिसत असून, चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
एका फोटोत ती समुद्राच्या लाटांमध्ये उभी आहे, तर दुसऱ्या फोटोत एक सुंदर रस्ता आणि आकाशातील ढगांचे विलोभनीय दृश्य दिसत आहे.
-
स्मृतीने या पोस्टला बीच आणि छत्री यांचे इमोजी वापरून कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोंवर अवघ्या काही तासांत लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
स्मृती मानधना ही केवळ तिच्या खेळासाठीच नाही, तर तिच्या साधेपणासाठी आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते.
-
जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी स्मृती ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्मृती मानधना/इन्स्टाग्राम)
“ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल?” जुना फोटो बघून तुम्हीही पडाल प्रेमात, Video एकदा पाहाच