-
आयपीएल २०२६ चा थरार सध्या शिगेला पोहोचला असून मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
-
यंदाच्या हंगामात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात प्रभावशाली ठरलेल्या अशा पाच धडाकेबाज फलंदाजांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा:
-
समीर रिझवी : दिल्ली कॅपिटल्सच्या या युवा फलंदाजाने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीने आणि ९० धावांच्या तुफानी खेळीने षटकारांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.
-
टिम डेव्हिड : डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांचा धुव्वा उडवत टिम डेव्हिडने आरसीबीचा मुख्य ‘फिनिशर’ म्हणून आपला दबदबा निर्माण केला आहे.
-
रजत पाटीदार : संयम आणि आक्रमकता यांचा मेळ घालत रजत पाटीदारने आरसीबीच्या फलंदाजीला स्थिरता देतानाच षटकारांचा पाऊस पाडला आहे.
-
रायन रिकलटन : मुंबई इंडियन्सचा हा दक्षिण आफ्रिकी खेळाडू आपल्या निर्भीड फलंदाजीने आणि मोठ्या खेळीने या हंगामातील ‘सरप्राइज पॅकेज’ ठरला आहे.
-
रोहित शर्मा : अनुभवाच्या जोरावर चेंडूची लांबी अचूक ओळखत रोहित शर्माने आजही आपण आयपीएलमधील सर्वात घातक षटकार बहाद्दर असल्याचे सिद्ध केले आहे.
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण