-
आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरूवात झाली होती. या स्पर्धेला भारतीय क्रिकेटमधील क्रांती असंही म्हटलं जातं. कारण या स्पर्धेने युवा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून दिलं. यासह पैसा आणि प्रसिद्धीही दिली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या स्पर्धेत आतापर्यंत अनेक असे फलंदाज होऊन गेली, ज्यांनी शतकं झळकावली आहेत. पण पहिलं शतक झळकावणारा भारतीय फलंदाज कोण? हे खूप कमी लोंकाना माहीत आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयपीएल स्पर्धेत पहिलं शतक झळकावणारा भारतीय फलंदाज मनिष पांडे आहे. त्याने २००९ मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये हा पराक्रम केला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने डेक्कन चार्जर्सविरूद्ध ७३ चेंडूत ११४ धावांची खेळी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ही शतकी खेळी त्याने दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन येथील सुपरस्पोर्ट मैदानावर केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ज्यावेळी त्याने हे शतक झळकावलं होतं, त्यावेळी त्याचं वय १९ वर्ष २५३ दिवस इतकं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत