-
आयपीएल स्पर्धेत १८ एप्रिल २००८ हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण याच दिवशी स्पर्धेतील पहिला सामना खेळला गेला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. याच सामन्यात या स्पर्धेच्या इतिहासातील पहिली विकेट पडली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दिग्गज गोलंदाज झहीर खान हा या स्पर्धेत पहिला विकेट घेणारा गोलंदाज ठरला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
झहीर खानने कोलकाता नाईट रायडर्स संघातील अनुभवी फलंदाज सौरव गांगुलीला बाद करत माघारी धाडलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
झहीर खानने हा विकेट पहिल्याच डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर घेतला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या सामन्यात वादळी शतकी खेळी करणारा ब्रेंडन मॅक्क्युलम चर्चेत राहिला होता. पण झहीर खानने देखील लक्षवेधी कामगिरी केली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण