-
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने आपली पत्नी राधिका धोपवकरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे जादू आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा Rads!” अशी रोमँटिक कॅप्शन अजिंक्यने या पोस्टला दिली आहे.
-
अजिंक्य आणि राधिका यांची पहिली ओळख ते शाळेत असताना झाली आणि तेव्हापासून ते एकमेकांना ओळखतात.
-
प्रेमात पडण्यापूर्वी अजिंक्य आणि राधिका हे एकमेकांचे अत्यंत जवळचे आणि चांगले मित्र होते.
-
अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर २६ सप्टेंबर २०१४ रोजी हे दोघे अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले.
-
अजिंक्य आणि राधिका यांना दोन मुले असून त्यांच्या सुखी संसाराची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.
-
त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव आर्या आणि धाकट्या मुलाचे नाव राघव असे आहे.
-
राधिकाच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यने व्यक्त केलेल्या या भावना पाहून चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- अजिंक्य रहाणे इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत