-
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या तिच्या मैदानाबाहेरील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
तिने नुकतेच तिच्या स्वित्झर्लंड सहलीचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
पिवळ्या रंगाचे स्वेटर, काळी पँट आणि सनग्लासेसमध्ये तिचा लूक अतिशय कूल आणि स्टायलिश वाटत आहे.
-
एका फोटोमध्ये स्मृती छान कॉफीचा आनंद घेतानादेखील पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंना तिने ‘स्वित्झर्लंडची एक छोटी आणि मजेशीर सहल!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तसेच तिने ‘काहीतरी रोमांचक येत आहे, ओळखा पाहू काय?’ असा प्रश्न विचारून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
-
सोशल मीडियावरील पॅचअपच्या चर्चेनंतर स्मृती मानधना या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
-
स्मृतीचे हे ग्लॅमरस फोटो सध्या इंटरनेटवर तुफान पसंती मिळवत असून नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्मृती मानधना/इन्स्टाग्राम)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम