-
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी १९६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार अर्धशतकं झळकावली आणि पंजाबला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. दरम्यान पाहा या सामन्यातील टॉप मोमेंट्स. (फोटो- एक्स)
-
क्विंटन डीकॉकचं शतक- रोहित शर्माला विश्रांती दिल्यानंतर क्विंटन डी कॉकला सलामीला येण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने ५३ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. (फोटो- एक्स)
-
नमन धीरचं अर्धशतक- मुंबईला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले होते. त्यामुळे भागीदारी होणं फार गरजेचं होतं. असं असतानाही नमन धीरने क्विंटन डी कॉकची साथ दिली. दोघांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान नमन धीरने ५० धावा केल्या. (फोटो- एक्स)
-
श्रेयस अय्यरचा कॅच- हार्दिक पंड्या या डावात काही खास करु शकला नाही. पण त्याला बाद करण्यासाठी श्रेयस अय्यरने बाऊंड्री लाईनवर भन्नाट रिले कॅच घेतला. हा कॅच पाहून रोहित शर्मा- सूर्यकुमार यादव देखील शॉक झाले. (फोटो- एक्स)
-
श्रेयस अय्यर- जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज असते, तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात पुढे उभा असतो. या सामन्यातही दमदार अर्धशतकी खेळी करुन पंजाबला विजय मिळवून दिला. (फोटो- एक्स)
-
प्रभसिमरन सिंग- प्रभसिमरन सिंग प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध करतोय. या सामन्यातही त्याने ८० धावांची खेळी केली. (फोटो- एक्स)
-
रोहित शर्मा- सामन्यानंतर रोहित आणि रिकी पाँटींगच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (फोटो- एक्स)
Numerology: वैभव सूर्यवंशीसारखं यश मिळवतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं? लहान वयातच पुढे जातात, लवकरच मिळते पैसा, प्रसिद्धी; अंकशास्त्र काय सांगतं..