-
विराट कोहली एके काळी आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता, पण आता तसं नाही. २१ कोटी रुपयांच्या मानधनासह, कोहली आता या टी-२० लीगमध्ये पाचवा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे.
-
विराट कोहली या स्पर्धेच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा भाग आहे. विराट सातत्याने १९ वर्षे एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी आरसीबीने त्याला २१ कोटी रुपयांना संघात कायम ठेवलं.
-
आयपीएल २०१८ पूर्वी, आरसीबीने विराट कोहलीला १७ कोटी रुपयांना रिटेन करत इतिहास घडवला होता.रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत ही रक्कम सर्वाधिक होती. कोहली आरसीबीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. आता आपण आयपीएलमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या चार खेळाडूंवर एक नजर टाकूया.
-
ऋषभ पंत-ऋषभ पंत हा आयपीएळ इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. लखनौ सुपर जायंट्सने २०२५च्या लिलावात त्याला २७ कोटींना विकत घेतलं होतं.
-
श्रेयस अय्यर-श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागड खेळाडू आहे. पंजाब किंग्सने त्याला २६.७५ कोटींना ताफ्यात सामील केलं होतं. श्रेयस अय्यरने २०२५ मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीत नेत मोठी ऐतिहासिक कामगिरी केली होती.
-
कॅमेरून ग्रीन हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ग्रीनला केकेआर संघाने २०२६ च्या मिनीलिलावात २५.२० कोटींना ताफ्यात सामील केलं.
-
हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबाद संघाने २३.७५ कोटींना रिटेन करत संघात कायम ठेवलं. रिटेन केलेल्या खेळाडूला दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे.
“कितीही निदर्शने केली तरी ज्ञानेश कुमार…”; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, अभिजीत दिपकेंना दिला ‘हा’ सल्ला