-
भारतीय क्रिकेट वर्तुळात ‘हिटमॅन’ या नावाने लोकप्रिय असलेला फलंदाज रोहित शर्मा आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितचा जन्म १९८७ साली नागपूरमध्ये झाला होता.
-
रोहितच्या या खास दिवसाचे औचित्य साधत जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नी रितिका सजदेह हिने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
रितिकाने रोहितसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे रो! तू माझा बेस्ट फ्रेंड आणि सोबती आहेस हे मी दरवर्षी सांगते आणि यावर्षीही तेच सांगेन. आपल्या या सुंदर नात्याला पुढच्या अनेक जन्मांची साथ लाभो, हीच इच्छा.”
-
सोशल मीडियावर सध्या रोहितच्या वाढदिवसाचे आणि रितिकाने शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: रोहित शर्मा/इन्स्टाग्राम)
७७ वर्षांचा वनवास संपला! जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा बीनागुंडा दौरा ऐतिहासिक का? जाणून घ्या