-
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ४ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिममध्ये खेळवला जाणार आहे.
-
मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामन्यापूर्वी अर्जुन तेंडुलकर संपूर्ण लखनौ संघाला आपल्या मुंबईतील राहत्या घरी घेऊन गेला होता.
-
लखनौचा संपूर्ण संघ या निमित्ताने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची भेट घेतली आणि खेळाडूंनी मास्टर ब्लास्टरसह फोटोदेखील काढले.
-
यंदाच्या आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे, पण अद्याप त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
-
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. लखनौचा संघ १०व्या स्थानी तर मुंबई इंडियन्स संघ नवव्या स्थानी आहे.
-
मुंबई इंडियन्सने ९ पैकी ७ सामने गमावले असून संघाचे ४ गुण आहेत.
-
तर लखनौने ८ पैकी ६ सामने गमावले असून संघ ४ गुणांवर आहे. लखनौने सलग पाच सामने गमावल्याने संघ अखेरच्या स्थानी आहे. (फोटो सौजन्य-@LSG,@MumbaiIndians-Instagram)
‘युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडे दोनच पर्याय’, इराणचा मोठा इशारा; IRGC ने कोणते दोन पर्याय दिले? वाचा!