तिला न्याहाळताना सूर्यादादाचं भान हरपलं! देविशाने शेअर केले डोहाळे जेवणाचे गोड फोटो; असा पार पडला होता सोहळा
Surya’s Wife Devish Shetty Baby Shower Photos: सूर्यकुमार यादव व देविशा शेट्टी यांना मुलगी झाली, यानंतर आता देविशाने डोहाळे जेवणाचे गोड फोटो शेअर केले आहेत.
सूर्या व देविशा त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव रिधिमा असं ठेवलं आहे. तिच्या जन्मानंतर आता देविशाने डोहाळे जेवणाचे गोड फोटो शेअर केले आहेत.सूर्या व देविशाच्या आईबाबांचा कार्यक्रमादरम्यानचा फोटो लक्षवेधी आहे.देविशाच्या डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी सुंदर आरास करण्यात आली होती. फुलांच्या छान सजावटीने या कार्यक्रमाला चार चांद लावले आहे.सूर्यादादा आणि देविशाचा या समारंभातील एक रितरिवाज करतानाचा छान फोटोही तिने शेअर केला आहे.देविशाचं सुवासिनी औक्षण करताना आणि त्याचदरम्यान सूर्या तिच्याकडे पाहतानाचा फोटो तर चाहत्यांचं मनं जिंकून घेत आहे.देविशाने तिच्या डोहाळेजेवणासाठी खास साऊथ इंडियन लुक केला आहे. तिच्या हिऱ्याच्या दागिन्यांनी तिचा लूक अधिक खुलवला आहे.डोहाळे जेवण कार्य्रकमातील नव्या आई-बाबांचा कँडिड फोटोही खूप सुंदर दिसतोय.सूर्या व देविशा या दोघांच्याही आई देविशाला गिफ्ट देतानाचा सुंदर फोटो लक्ष वेधून घेत आहे.देविशा शेट्टीचे डोहाळे जेवणाचे सर्व फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.वरील सर्व फोटो सौजन्य -@devishashetty Instagram