-
वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फटकेबाजीने तर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यादरम्यान त्याच्या षटकारांच्या आतिषबाजीसमोर तर बडे बडे गोलंदाज फिके पडले.
-
याशिवाय सूर्यवंशीने पॅट कमिन्स, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, प्रसिध कृष्णा, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क या गोलंदाजांविरूद्धही षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
-
वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूवर षटकार खेचणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर आहे. आयपीएल २०२५च्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती.
-
जगातील उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यंदाच्या सीझनमध्ये त्याने षटकार लगावला होता.
-
राजस्थान-मुंबई सामन्यात ट्रेंट बोल्टच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचला होता.
-
यंदाच्या मोसमात त्याने गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात मोहम्मद सिराजच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता.
-
तर लुंगी एनगिडी ज्याने आपल्या स्लोअर चेंडूने भल्या भल्या फलंदाजांना चकवलं, त्याच्याही पहिल्याच चेंडूवर सूर्यवंशीने षटकार मारला.
-
याशिवाय सूर्यवंशीने पॅट कमिन्स, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, प्रसिध कृष्णा, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क या गोलंदाजांविरूद्धही षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.(फोटो सौजन्य-गजत, लोकसत्ता संग्रहित फोटो)
वडिलांसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं; लहान वयातच संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवत वडिलांची गरिबी दूर करतात