-
माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
या सुंदर आणि रोमँटिक ट्रिपवर त्यांचा चिमुकला मुलगा फतेहसिंह खान देखील त्यांच्यासोबत आहे.
-
सागरिकाने सोशल मीडियावर या कौटुंबिक सहलीचे काही अतिशय सुंदर आणि नयनरम्य फोटो शेअर केले आहेत.
-
पाण्यात पोहताना तिने पांढऱ्या रंगाची स्टायलिश हॅट घातली असून तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
दुसऱ्या एका फोटोत झहीर आणि सागरिका हातात हात घालून मालदीवच्या एका सुंदर रस्त्यावरून चालताना दिसत आहेत.
-
यावेळी सागरिकाने फुलांची डिझाईन असलेला फ्लोरल वनपीस ड्रेस घातला असून खांद्यावर एक मोठी पांढरी बॅग घेतली आहे.
-
झहीर खानने पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाची शॉर्ट्स घातली असून दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना खूपच गोड दिसत आहेत.
-
एका फोटोत झहीर आपल्या लाडक्या मुलाला हवेत धरून त्याच्यासोबत आनंदाचे क्षण घालवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सागरिका घाटगे /इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत