-
निवृत्तीनंतर शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय राहिला आहे. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच मजेशीर रील्स शेअर करत असतो, ज्यामध्ये अनेकदा त्याची पत्नी सोफीदेखील असते.
-
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि रोहित शर्माचा साथीदार शिखर धवनने दुसरं लग्न केलं आहे. त्याने सोफी शाईनसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
आयर्लंडमध्ये जन्मलेल्या सोफीने शिखर धवनसह २१ फेब्रुवारी २०२६ ला लग्नगाठ बांधली. लग्न करण्यापूर्वी ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
-
बालीमधील मंदिरात धवन व त्याची पत्नी पवित्र जलशुद्धीकरण विधीत सहभागी झाली होते. त्यामुळे त्यांनी विशेष हिरव्या रंगाचे वस्त्र ज्याला सारोंग म्हटलं जातं ते परिधान केलं आहे.
-
शिखरने शेअर केलेल्या फोटोमध्ये धवन व सोफी बालीमधील ट्रेडिशनल कपड्यांमध्ये दिसत आहेत, जिथे त्यांनी सारोंग व सॅश घातला आहे.
-
शिखर धवन व सोफी शाईन लग्नानंतर पुन्हा एकदा ट्रीपवर गेले आहेत. यावेळेस दोघं बाली ट्रिपला गेले असून तेथील फोटो शेअर केले आहेत.
-
धवनने या पोस्टदरम्यान मंदिरात दर्शन घेतानाचा व्हीडिओदेखील शेअर केला आहे.
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण