-
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
पद्मश्री पुरस्कार सोहळ्यासाठी हरमनप्रीत कौरने अत्यंत सुंदर आणि शालीन असा पांढऱ्या रंगाचा एथनिक सूट परिधान केला होता.
-
या पारंपरिक आणि स्टायलिश ड्रेससोबत तिने मॅचिंग दुपट्टा परिधान करून आपला लूक पूर्ण केला होता.
-
या खास सोहळ्यातील आपले दोन फोटो तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पहिल्या फोटोमध्ये हरमनप्रीत राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांवर हातात पद्मश्री पुरस्कार घेऊन अभिमानाने उभी असलेली दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ती हा प्रतिष्ठित सन्मान स्वीकारताना दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘आज अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना माझे हृदय कृतज्ञता आणि अभिमानाने भरून आले आहे.’
-
२०२५ मध्ये भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषक जिंकवून देणाऱ्या या कर्णधारावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: हरमनप्रीत कौर/इन्स्टाग्राम)
आजपासून सूर्याचे मिथुन राशीत पदार्पण; ‘या’ ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर ‘या’ राशींना आरोग्याची घ्या काळजी