-
वैभव सू्र्यवंशी सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे. वैभवने दुसऱ्याच हंगामात अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. दरम्यान वैभवला जगासमोर कोणी आणलं? हे खूप कमी लोकांना माहीत आहे. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
-
समर काद्री हे मूळचे पाटण्याचे आहेत. त्यांनी २००९ ते २०२१ या काळात झारखंड संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी ४५ सामन्यांमध्ये १५७ गडी बाद केले. (फोटो- एक्स)
-
पाटण्यातील स्थानिक सामन्यादरम्यान समर काद्री यांनी वैभवला फलंदाजी करताना पाहिलं. वैभवने त्या सामन्यादरम्यान ५० चेंडूत दमदार शतक झळकावलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यांमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
-
त्याची फलंदाजी पाहून समर काद्री यांनी ही गोष्ट राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापकांना सांगितली. त्याला ट्रायलसाठी बोलवण्यात आलं. त्याने ट्रायलमध्ये ३ चेंडूत सलग ३ षटकार खेचले होते. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
-
ट्रायलदरम्यान झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ६० चेंडूंचा सामना करत १५० धावांची खेळी केली होती. तेव्हाच राजस्थानने ठरवलं होतं की, वैभवला कुठल्याही परिस्थितीत आपल्या संघात स्थान द्यायचं. लिलावात राजस्थानने त्याला १.१० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
कतरिना कैफ व विकी कौशलने पापाराझींना पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा; केली खास विनंती