-
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या हंगामात त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ज्या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार गोलंदाजी केली आहे, ते गोलंदाज वैभवसमोर गोलंदाजी करताना अडचणीत आल्याचे दिसून आले. पॅट कमिन्स असो किंवा मग जसप्रीत बुमराह, कुठलाही दिग्गज गोलंदाज या १५ वर्षीय फलंदाजाला बाद करु शकलेला नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान या हंगामात एकमेव असा गोलंदाज आहे, ज्याने वैभवसमोर गोलंदाजी करताना निर्धाव षटक टाकलं आहे. कोण आहे तो गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
लखनौ सुपर जायंट्स संघातील गोलंदाज मोहसिन खान हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने वैभव सूर्यवंशीसमोर गोलंदाजी करताना निर्धाव षटक टाकलं आहे. (फोटो- फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या हंगामात २२ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान मोहसिन खानने वैभवविरूद्ध गोलंदाजी करताना निर्धाव षटक टाकलं होतं. (फोटो- फायनान्शियल एक्सप्रेस)
-
हे वैभवविरुद्ध गोलंदाजी करताना पहिलं आणि एकमेव निर्धाव षटक ठरलं. या सामन्यात मोहसिन खानने त्याला ८ धावांवर बाद करत माघारी धाडलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ