-
आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा (GT) ५ गडी राखून पराभव केला. यासह आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आणि इतिहासातील आपले दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
-
या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीचे खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
विराट कोहलीने अवघ्या २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आणि ७५ धावांची मॅच-विनिंग नाबाद खेळी खेळली.
-
गोलंदाजीत रसिक सलाम (३/२७), भुवनेश्वर कुमार (२/२९) आणि जोश हेझलवूड (२/३७) यांच्या अचूक माऱ्यामुळे गुजरातला १५५ धावांवर रोखण्यात यश आले.
-
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा जेतेपद राखणारा आरसीबी हा आयपीएलच्या इतिहासातील केवळ तिसरा संघ ठरला आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांनी विराट कोहलीला ‘मॅन ऑफ मेगा मोमेंट्स’ (Man of Mega Moments) म्हणून ट्रेंड केले आहे.
-
आरसीबीचा स्टार फलंदाज रजत पाटीदार याने पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा विजय आणि ही ट्रॉफी आरसीबीच्या त्या निष्ठावंत चाहत्यांना समर्पित आहे, जे नेहमी संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.”
-
(सर्व फोटो सौजन्य : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू/इन्स्टाग्राम)
VIDEO: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमध्ये आंदोलनावेळी हल्ला