-
वैभव सूर्यवंशी हे नाव आयपीएल २०२६ स्पर्धेत तुफान चर्चेत राहिलं. १५ वर्षांच्या मुलाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले. यासह अनेक पुरस्कारही जिंकले. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभवने या हंगामात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्डही मोडून काढला. त्यामुळे त्याला बॉस बेबी असं म्हटलं जात आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभवने आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत. दरम्यान २३ सामन्यानंतर कसा होता दोघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ख्रिस गेलने आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या २३ सामन्यांमध्ये १०७१ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या २३ सामन्यांमध्ये १०२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान वैभवने देखील २ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हा रेकॉर्ड पाहता, ख्रिस गेल वैभवहून थोडा पुढे आहे. पण वैभवने हे सर्व वयाच्या १५ व्या वर्षी करुन दाखवलं आहे. यासह सर्वात जलद (कमी चेंडूत) १००० धावा करण्याचा रेकॉर्ड हा वैभव सूर्यवंशीच्या नावे आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…