-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला.
-
टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स चषक या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रपती भवनात त्याचा हा भव्य गौरव करण्यात आला.
-
एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असण्यासोबतच रोहित शर्मा हा आपल्या कुटुंबाला जपणारा आणि खाण्याचा प्रचंड आवड असलेला एक अस्सल खाद्यप्रेमी म्हणून ओळखला जातो.
-
खेळाडू म्हणून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो पौष्टिक आहाराला प्राधान्य देतो, तर दुसरीकडे त्याला मुंबईतील रस्त्यांवरील चवदार खाद्यपदार्थ खायलाही खूप आवडते.
-
रोहित शर्माच्या अत्यंत आवडत्या पदार्थांमध्ये महाराष्ट्राची पारंपरिक आणि प्रसिद्ध ‘कोथिंबीर वडी’ हा पदार्थ अगदी आघाडीवर आहे.
-
कोथिंबीर वडी हा पदार्थ प्रामुख्याने ताज्या कोथिंबिरीची पाने आणि हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजे बेसन वापरून बनवला जातो, जो चवीला अत्यंत उत्कृष्ट आणि शरीराला ऊर्जा देणारा असतो.
-
बेसनामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्याने आणि सोबतच तीळ व विविध मसाल्यांमुळे या वडीतून शरीराला आवश्यक असणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.
-
कोथिंबीर वडीसोबतच रोहित शर्माला पाणीपुरी, मिसळपाव, वडापाव, पावभाजी, बटर चिकन, बटाट्याचे पराठे आणि वरण-भात हे पदार्थ खायला देखील प्रचंड आवडते.
-
(सर्व फोटो सौजन्य: रोहित शर्मा/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा