-
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास घडला आहे. वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघासाठी पदार्पण केलं आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण वैभव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू नाही, तर त्याच्याआधी देखील २ खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, तर हा रेकॉर्ड रोमानियाच्या मॅरियन घेरिसिमच्या नावे आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्याने ज्यावेळी पदार्पण केलं, त्यावेळी त्याचं वय १४ वर्षे आणि १६ दिवस इतकं होतं. (फोटो- एक्स)
-
तर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख देशांमध्ये हा विक्रम पाकिस्तानच्या हसन रझाच्या नावे आहे. त्याने १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना वय अवघे १४ वर्ष २२७ दिवस इतकं असताना कसोटी पदार्पण केलं होतं. (फोटो- एक्स)
-
भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा रेकॉर्ड वैभव सूर्यवंशीने मोडून काढला आहे. वैभवने वय १५ वर्ष ९९ दिवस असताना भारतासाठी पदार्पण केलं आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे होता. त्याने १९८९ मध्ये वय १६ वर्षे आणि २०५ दिवस इतकं असताना पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत