-
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे फुटबॉल विश्वातील २ दिग्गज खेळाडू आहेत. फुटबॉलचा चाहता वर्ग या २ खेळाडूंमध्ये विभागला गेला आहे. काहींना मेस्सी आवडतो तर काहींना रोनाल्डो. (फोटो- एक्स)
-
या दोन्ही दिग्गजांची फॅन फॉलोइंग इतकी का आहे, याचा अंदाज दोघांची मैदानावरील कामगिरी पाहून येईलच. दोघांनीही आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. पण दोघांपैकी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू कोण? जाणून घ्या. (फोटो- एक्स)
-
कमाईच्या बाबतीत दोघेही अब्जाधीशांच्या यादीत आहेत. दोघांनीही कमाईच्या बाबतीत अब्जावधी डॉलर्स संपत्तीचा टप्पा ओलांडला आहे. (फोटो- एक्स)
-
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा कमाईच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी आहे. २०२६ च्या फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, रोनाल्डोची संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (सुमारे १०,००० कोटी) च्या घरात आहे.रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून खेळतो. या क्लबकडून त्याला विक्रमी मानधन देण्यात आलं आहे. (फोटो- एक्स)
-
तर लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानी आहे. मेस्सीची एकूण संपत्ती ही १.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९२००) कोटींच्या घरात आहे. मेस्सीने इंटर मियामीच्या क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली . (फोटो- एक्स)
-
मेस्सी कमाईच्या बाबतीत रोनाल्डोपेक्षा फार मागे नाही. पण सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. (फोटो- एक्स)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”