-
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा आज १८ जुलै रोजी वाढदिवस आहे.
-
या खास दिनानिमित्त तिची मैत्रीण आणि सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
-
विशेष म्हणजे जेमिमाने हे फोटो शेअर करताना पार्श्वभूमीला मराठीतील अत्यंत लोकप्रिय असलेले ‘तू ही रे माझा मितवा’ हे गाणं जोडलं आहे.
-
या भावनिक पोस्टसोबत जेमिमाने स्मृतीला मिठी मारतानाचे आणि मैदानावरील त्यांच्या मैत्रीचे घट्ट नाते दर्शवणारे खास फोटो शेअर केले आहेत.
-
मैदानाबाहेरही या दोघींची मैत्री किती घट्ट आणि जिव्हाळ्याची आहे, हे जेमिमाच्या या खास पोस्टमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
जेमिमाने स्मृतीसोबतचे सुंदर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘From loving me at my lowest to sprinting the fastest to lift me up at my highest, what can I say apart from the fact that I’m so grateful to have you in my life. Runs, trophies, accolades come and go but what stays is the love and care we have for each other 🙂 So to my (now buddhi) elder sister, Happy Birthday!! I love you with all my heart!!’
-
सोशल मीडियावर या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंच्या फोटोंना आणि त्यांच्यातील या सुंदर बाँडिंगला चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.
-
स्मृतीच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा विश्वातून तसेच जगभरातील चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जेमिमा रॉड्रिग्ज/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ