-
भारतीय संघातील विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने भावुक व्हीडिओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.
-
अजिंक्य रहाणे जवळपास तीन वर्षे भारतीय संघाबाहेर होता. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना होता. २०१८ नंतर त्याला एकदिवसीय संघातून आणि २०१६ नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं होतं.
-
अजिंक्य रहाणेचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्रात झाला. त्याचं बालपण डोंबिवलीतं गेलं. त्याने आपले सुरुवातीचे शिक्षण डोंबिवलीतील एस. व्ही. जोशी हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.
-
अजिंक्य रहाणेला शाळेतील अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये अधिक रस होता. शाळेतील ब्रेकमध्येही अजिंक्य क्रिकेटच्या सरावासाठी मैदानावर जात असे. हळूहळू त्याने संपूर्ण लक्ष क्रिकेटमध्ये देत अभ्यासाा त्याने पूर्णविराम दिला.
-
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, रहाणेने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. वृत्तांनुसार, त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेत पदवी (बॅचलर ऑफ कॉमर्स) पूर्ण केली.
-
रहाणेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. साधनसामग्रीच्या अभावामुळे, वयाच्या साधारण १७ व्या वर्षापर्यंत त्याने ‘मॅटिंग विकेट्स’वरच क्रिकेटचा सराव केला. त्याचे प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी त्याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला सतत मार्गदर्शन केलं.
-
अजिंक्य रहाणेने सुरूवातीला मुंबईच्या क्रिकेट विश्वात स्वत:चं नाव कमावलं. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतर त्याला भारत अ संघात स्थान दिलं आणि त्यानंतर अ संघातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान केलेल्या कामगिरीच्या बळावर त्याला टीम इंडियात संधी मिळाली.
जंतर-मंतरवर पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीनं मागितली माफी; म्हणाली, ‘मी फक्त १५ वर्षांची आहे’