-
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे.(फोटो -एक्स)
-
संघाबाहेर असताना तो आयपीएल स्पर्धेतील ट्रेडमुळे चर्चेत आहे. हार्दिक मुंबई इंडियन्सची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्स संघात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. (फोटो -एक्स)
-
ही चर्चा रंगली असताना, हार्दिक पंड्या आणखी एक कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आपली गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत देवदर्शन करायला गेल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (फोटो -एक्स)
-
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिकने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि धोती परिधान केली आहे. यासह टक्कल देखील केलं आहे.(फोटो -एक्स)
-
हार्दिकसह त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा देखील आहे. यादरम्यान दोघांनी आपल्या फॅन्ससोबत फोटो क्लिक केले.(फोटो -एक्स)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक