-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत निवांत वेळ घालवत आहे.
-
रोहितने सोशल मीडियावर आपल्या कौटुंबिक सुटीतील काही खास आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह गार्डनमध्ये एकत्र बसून खूपच छान पोज देताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये रोहित आपल्या मुलांसोबत खेळताना आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवताना दिसून येत आहे.
-
एका फोटोत रोहित गवतावर पडून स्वतः मोबाईलवरून आपल्या मुलांचे फोटो टिपताना दिसत आहे.
-
रोहित शर्माचे हे कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच तुफान व्हायरल झाले असून, चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
मैदानातील आक्रमक ‘हिटमॅन’ आणि वैयक्तिक आयुष्यातील काळजीवाहू पिता, अशा रोहितच्या दोन्ही रूपांचे चाहते कौतुक करीत आहेत.
-
या फोटोंवर कमेंट करताना एका चाहत्याने “Kabhi Hitman, always family man” असे लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य: रोहित शर्मा/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक