-
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी ११ ऑगस्ट २०२६ ला विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
-
जवळपास दशकभरापूर्वी एका योगायोगाने सुरू झालेला त्यांचा प्रवास आज फुटबॉल जगतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लव्हस्टोरींपैकी एक मानला जातो.
-
या दोघांची पहिली भेट जून २०१६ मध्ये माद्रिदमधील गूची बुटीकमध्ये झाली. त्या वेळी जॉर्जिना दुकानात सहाय्यक म्हणून काम करत होती, तर रोनाल्डो रिअल माद्रिदसाठी खेळत होता. रोनाल्डो दुकानात आला आणि जॉर्जिनाने लगेच त्याचं लक्ष वेधून घेतलं.
-
जॉर्जिनाने नंतर त्यांच्या पहिल्या भेटीचं वर्णन “पहिल्याच नजरेत प्रेम” असं केलं होतं. काही दिवसांनी ते दोघे एका ब्रँड कार्यक्रमात पुन्हा भेटले आणि तेव्हा त्यांना कामाच्या वातावरणापासून दूर निवांतपणे बोलण्याची संधी मिळाली.
-
सुरूवातीला दोघांनी आपलं नात खाजगी ठेवलं. २०१६ च्या अखेरीस ते डिस्नेलँड पॅरिसमध्ये एकत्र दिसले, जिथे रोनाल्डोने विग आणि सनग्लासेस घालून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर २०१७ च्या सुरुवातीला झालेल्या The Best FIFA Football Awards कार्यक्रमात त्यांनी पहिल्यांदा रेड कार्पेटवर एकत्र हजेरी लावली.
-
रोनाल्डोच्या फुटबॉल कारकिर्दीसह त्यांचं नातंही सतत पुढे जात राहिलं. २०१८ मध्ये रोनाल्डो युव्हेंटसमध्ये दाखल झाल्यानंतर ते माद्रिदहून ट्युरिनला गेले. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडमध्ये परतल्यानंतर काही काळ ब्रिटनमध्ये राहिले आणि अखेरीस अल-नासरमध्ये सामील झाल्यानंतर रियाधमध्ये स्थायिक झाले.
-
जॉर्जिनाच्या नेटफ्लिक्स मालिकेत I Am Georgina मध्ये रोनाल्डोने कबूल केलं होतं की सुरुवातीला हे नातं इतकं घट्ट होईल, अशी त्याला अपेक्षा नव्हती.
-
आज रोनाल्डो आणि जॉर्जिना पाच मुलांचे पालक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते फुटबॉल जगतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक मानले जातात.
“…तर मनापासून माफी मागतो”, येरवडा कारागृहातून सुटकेनंतर संतोष पंडित म्हणाले, “मी संवैधानिक अधिकार…”