-
क्रिकेटपटूंच्या घरी देखील गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली जात आहे. झहीर खानच्या घरच्या गणेशोत्सवाचे फोटोदेखील समोर आले आहेत.
-
झहीर खानची पत्नी सागरिका घाटगेने घरातील गणपती बाप्पाच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत.
-
सागरिकाने देवघरातील फोटो शेअर केला असून चांदीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची मनोभावे पूजा केली आहे. यादरम्यान समोरच्या चांदीच्या ताटाने, निरंजनाने आणि चांदीच्या ताटातील मोदकाने विशेष लक्ष वेधलं.
-
गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि खीर याचा नैवेद्य ठेवलेला फोटोही सागरिकाने शेअर केला आहे.
-
सागरिकाच्या सेल्फीमध्ये देवघरात झहीर खान असलेला फोटोदेखील पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान झहीर खान डोक्याला लाल टिळा लावलेला आणि त्यांच्या कुत्र्याला जवळ घेत असलेला फोटो विशेष लक्षवेधी ठरला.
-
सागरिकाने त्यांचा लेक फतेहसिंगला प्रेमाने जवळ घेतलेला फोटो खूप गोड आहे.
‘गोकूळ’च्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनी सरकारसमोर ठेवला नवा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरही दिली प्रतिक्रिया