-
लॅपटॉपवर खूप सारे टॅब्स ओपन असतील, तर वापर करत नसलेले टॅब्स बंद करा. टॅब्स आपल्या प्रोसेसर आणि रॅमवर प्रभाव टाकतो. (Photo- संग्रहित)
-
आपल्या लॅपटॉप्समध्ये काही प्रोग्राम्स महिनाभरापासून डाउनलोड केलेले असतात. मात्र त्याचा आता काहीच वापर होत नसतो. हे प्रोग्रामन्स अनइन्स्टॉल करा. त्यामुळे स्पीड वाढण्यास मदत होईल. (Photo- संग्रहित)
-
अनेक प्रोग्राम्स डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. यामुळे, तुमच्या लॅपटॉपचा स्त्रोत चुकीच्या ठिकाणी वापरला जातो. यासाठी Ctrl + Shift + Esc एकाच वेळी दाबून तुम्ही बॅकग्राउंडमध्ये किती अॅप्स चालू आहेत ते पाहू शकता. वापरात नसलेल्या प्रोग्रामवर राईट क्लिक करा आणि End Task चा पर्याय निवडा. (Photo- संग्रहित)
-
आपण लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न देखील करू शकता. हे सोपे आहे, यामुळे तात्पुरती कॅशे मेमरी साफ करते. यानंतर डिव्हाइस कार्य करण्यास सुरवात करते. जेव्हा जेव्हा तुम्हाला डिव्हाइसवर ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यासाठी सूचना मिळते. जरूर अपडेट करा. (Photo- संग्रहित)
-
जेव्हा तुम्ही लॅपटॉप चालू करता तेव्हा अनेक प्रोग्राम्स आपोआप उघडतात. या स्टार्टअप अॅप्समुळे लॅपटॉपच्या कार्यक्षमतेत कालांतराने फरक पडतो. तुम्ही हे स्टार्टअप अॅप्स बंद करू शकता. यासाठी तुम्हाला Ctrl + Shift + Esc दाबून स्टार्टअप टॅबवर जावे लागेल. या पद्धती आपल्या संगणकाच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करतील. (Photo- संग्रहित)

धावत्या बाईकवर पडला पत्रा, दुचाकीस्वाराचे क्षणात दोन तुकडे, Video पाहून उडेल थरकाप…