
अॅपल आयफोन १२ हा २०२० मध्ये लॉंच झाल्यापासून भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक आहे. इच्छुक खरेदीदार अनेक ऑफर वापरून स्मार्टफोन फक्त ३९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

आयफोन १२ अधिक ऑफरची चर्चा आहे ती फ्लिपकार्टने ऑफर केली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ५६,९९९ रुपयांच्या रिटेल किंमतीत खरेदी करू शकतात.

पण अशा अनेक ऑफर्स आहेत, ज्या मिळवून तुम्ही आणखी स्वस्तात फोन खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट सध्या आयफोन १२ च्या खरेदीसाठी आपल्या जुन्या स्मार्टफोनच्या ट्रेडिंगवर १३,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. दरम्यान एक्सचेंज सवलत स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते.

कमीत कमी स्क्रॅच किंवा फोनच्या स्थितीनुसार हाय-एंड स्मार्टफोन एक्सचेंज केल्याने तुम्हाला फ्लिपकार्ट वरून तुमच्या आयफोन १२ खरेदीवर चांगली सूट मिळण्यास मदत होईल.

अशातच ग्राहकांनी लक्षात ठेवावे की एक्सचेंज ऑफर निवडक पिन कोडवर उपलब्ध आहे.

आयफोन १२ च्या खरेदीसाठी ग्राहक HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून ४,००० रुपयांची अतिरिक्त सुटचा लाभ घेऊ शकतात.

जर तुम्ही एक्सचेंज ऑफर आणि HDFC सवलत एकत्र केली तर तुम्ही फ्लिपकार्टवर फक्त ३९,९९९ रुपयांमध्ये आयफोन १२ खरेदी करू शकाल.

अॅपल आयफोन १२ A १४ बायोनिक चिपद्वारे समर्थित आहे. प्रोसेसर तिसऱ्या पिढीच्या न्यूरल इंजिनसह येतो आणि सुपर रेटिना XDR डिस्प्ले पॅक करतो.

अॅपल आयफोन १२ मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आणि पोर्ट्रेट मोड, ४k व्हिडिओ आणि स्लो-मोशन व्हिडिओसह १२MP TrueDepth फ्रंट कॅमेरा आहे.

तसेच फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे आणि जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.

या आयफोन मध्ये डिव्हाइस सुरक्षित करणासाठी फेस आयडी देखील प्रदान करण्यात आले आहे. (all photos: indian express)