
Redmi Note 11T 5G (१५,९९९ रूपये)
Xiaomi चा हा बजेट स्मार्टफोन चांगल्या बॅटरी लाइफसह गेमर्ससाठी उत्तम आहे. यात 5,000mAh बॅटरी आहे जी 33W चार्जर वापरून पटकन चार्ज करता येते. यात 6GB/8GB RAM आणि 64GB/128GB स्टोरेज मिळतो. हे ड्युअल-सिम 5G ला सपोर्ट करतं आणि 6.6-इंच फुल HD+ (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन डिस्प्ले मिळतोय. यात 50 MP रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. हे MediaTek Dimensity 810 चिपसेटद्वारे समर्थित आहे ज्यामध्ये Mali-G57 GPU सह ऑक्टा-कोर CPU आहे. (फोटो सोर्स : Redmi India)
Vivo T1 5G (१५,९९० रूपये)
विवोच्या टी सीरीजमधील हा पहिला स्मार्टफोन आहे. फोन ट्रिपल कॅमेरा सेटसह, 50-MP प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह मिळतो. पण यात अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा नाही आणि तो तुलनेने स्लो 18W चार्जरसह येतो. तुम्ही फोनचा बेस व्हेरिएंट १५,९९० रूपयांमध्ये खरेदी करू शकता. (फोटो- वीवो)
Moto G71 5G (१७,९९९ रूपये)
फोन 6.4 इंच FHD+ AMOLED स्क्रीनसह येतो आणि स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट देण्यात आली आहे. युजर्सना 50MP मुख्य + 8MP अल्ट्रावाइड + 2MP कॅमेरा सेन्सर देखील मिळतो. हे 30W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरीसह जोडलेले आहे. तुम्ही Android स्टॉक असलेला फोन शोधत असाल तर २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत मोबाईल विचारात घेण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Realme 9 5G Speed Edition (१९,९९९ रूपये)
हा फोन दोन 2MP सेन्सरसह 48MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. यात 5,000mAh बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे 144Hz FHD+ IPS LCD डिस्प्ले देखील मिळतो. (Image Source: The Indian Express/ Chetan Nayak)
OnePlus Nord CE 2 Lite 5G (१९,९९९ रूपये)
OnePlus Nord CE 2 Lite हा पहिला OnePlus फोन आहे ज्याची किंमत २०,००० रूपयांपेक्षा कमी आहे. यात दोन 2MP सेन्सर्ससह 64MP मुख्य रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5,000mAH बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्ही 6GB/128GB व्हेरिएंट १९,९९९ रुपयांमध्ये मिळवू शकता. (फोटो- OnePlus)