
पावसाळा आला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

पावसाळा हा प्रत्येकाला खूप आवडत असला तरी काही वेळा तो अनेक समस्याही घेऊन येतो.

पावसात आजारही लवकर जडतात आणि कुठे बाहेर जावं लागलं तर हा पाऊस खूप त्रास देतो.

पण पाऊस असो वा ऊन… प्रत्येकालाच कामानिमित्त बाहेर पडावे लागते.

आपण फक्त पावसाळ्यात स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे नाही तर या ऋतूत गॅजेट्सचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या पावसाळ्यात तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.

पावसाळ्यात लॅपटॉप नेहमी वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवूनच बाहेर न्या. हे पावसाच्या दरम्यान लॅपटॉपचे आर्द्रतेपासून संरक्षण देईल.

ओलावा शोषण्यासाठी सिलिका जेल पाउच पिशवीत ठेवा. (Photo : Indian Express Bangla)

पावसात लॅपटॉप ओला झाल्यास, बॅटरी डिस्कनेक्ट करा आणि सर्व बाह्य उपकरणे अनप्लग करा आणि ते स्वतःच कोरडे होऊ द्या.

बाहेर विजेचा गडगडाट होत असल्यास, कोणतेही पोर्ट बाह्य कनेक्शनशी जोडलेले नसल्याची खात्री करा.

जर तुम्ही तुमचा लॅपटॉप बाहेरच्या आर्द्रतेतून आणलात, तर तो बूट करण्यापूर्वी खोलीच्या तापमानावर सामान्य होऊ द्या.

लॅपटॉप झाकण्यासाठी एक मोठी प्लास्टिक बॅग कव्हर/सॉफ्ट टॉवेल नेहमी जवळ ठेवा.

(सर्व फोटो : Pexels)