-
Galaxy F54 5G हा सॅमसंगचा भारतातील नवीन परवडणारा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आणि 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Samsung Galaxy F54 5G ची भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २९,९९९ इतकी रुपये आहे.
-
फोनचा मागील भाग चकचकीत आहे. बेझल्स थोडे लहान असू शकतात
-
Samsung Galaxy F54 5G मध्ये, तुम्हाला पंचहोल कट-आउटसह मोठा ६.७ इंचांचा 1080p AMOLED डिस्प्ले मिळेल.
-
पॅनेलचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे.
-
तसेच यात तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ स्क्रीन सेफ्टी मिळते.
-
फोनमध्ये बायोमेट्रिक्ससाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट रीडर आहे.
-
Samsung Galaxy F54 5G मध्ये मागील बाजूस 108MP मुख्य (OIS सह) कॅमेरा 8MP अल्ट्रावाइड आणि आणखी 2MP मॅक्रो शूटरने सुसज्ज ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
-
मुख्य कॅमेरा (सेल्फी शूटर देखील) 30fps पर्यंत 4K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. Galaxy F54 5G ला अॅस्ट्रोलॅप्स आणि सिंगल टेक यासह सॅमसंगचे हाय-एंड कॅमेरा फीचर्स मिळतात.
-
यात Samsung ची Exynos 1380 चिप 8GB RAM आणि 256GB UFS2.2 स्टोरेजसह मिळते. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर चालतो.
-
Samsung Galaxy F54 5G 6,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. यासह यात 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Bill Gates on AI and Jobs : बहुतेक कामांमध्ये AI घेईल माणसांची जागा, फक्त ‘या’ तीन नोकऱ्या आहेत सुरक्षित : बिल गेट्स