-
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ॲपल’ला यशाच्या शिखरावर नेणारे टिम कुक आता सीईओ पदावरून पायउतार होत आहेत. स्टीव जॉब्स यांच्यानंतर कंपनीची सूत्रे हाती घेऊन कुक यांनी ॲपलला ३ ट्रिलियन डॉलरची कंपनी बनवली.
-
पण, कुक यांची कारकीर्द केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नव्हती, तर ती एका वेगळ्या विचारसरणीवर आधारलेली होती. याच निमित्ताने, त्यांचे ५ महत्त्वाचे विचार आणि त्यामागचे व्यावसायिक तत्वज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.
-
बदलापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य : “काही लोक ‘नवकल्पना’ म्हणजे केवळ बदल म्हणून पाहतात, पण आम्ही तसे कधीच पाहिले नाही. हे गोष्टी अधिक चांगल्या करण्याबद्दल आहे.”
-
ग्राहकांच्या गरजेचा अचूक वेध : “आमचे काम तुम्हाला असे काहीतरी देणे आहे, ज्याची तुम्हाला आधी माहिती नव्हती की तुम्हाला ते हवे आहे. आणि जेव्हा तुम्ही ते मिळवता, तेव्हा त्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.”
-
ध्येयावर लक्ष केंद्रित करा, नफ्यावर नाही : “जेव्हा कंपन्या गोंधळलेल्या असतात, तेव्हा त्यांना वाटते की त्यांचे ध्येय फक्त महसूल किंवा शेअरची किंमत आहे. पण त्यांनी त्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे ज्याच्यामुळे कंपनी या लक्ष्यापर्यंत पोहोचते.”
-
इतिहास घडवा : “इतिहास क्वचितच एखाद्या व्यक्तीसमोर झुकतो, पण जेव्हा असे होते तेव्हा ते लक्षात ठेवा. ती व्यक्ती तुम्ही असू शकता, ती तुम्ही असायला हवी आणि ती तुम्हीच असाल.”
-
मैदानात उतरा : “किनाऱ्यावर बसून आयुष्य जगू नका. जगाला तुमची गरज मैदानात आहे.”
-
१ सप्टेंबरपासून टिम कुक हे ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून मार्गदर्शक भूमिकेत असतील आणि जॉन टर्नस हे नवीन सीईओ म्हणून अॅपलची धुरा सांभाळतील.
-
टिम कुक यांनी जो पाया रचला आहे, त्यावर अॅपल भविष्यात कोणती नवी शिखरे सर करते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अग्रलेख: जंतर-मंतर-अंतर!