Photos: …अन् खड्ड्यात रंगला विटी दांडूचा खेळ
- 1 / 5
पुणे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्याच्या निषेधार्थ स्वारगेट चौकात काँग्रेसतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आले.
- 2 / 5
खड्ड्यांमध्ये विटी दांडू आणि गोट्या खेळून काँग्रेसने सत्ताधारी भाजपाचा निषेध केला.
- 3 / 5
आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि माजी महापौर अंकुश काकडे, माजी उपमहापौर सतीश देसाई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- 4 / 5
शहरातील अनेक रस्त्यांवर केबल कंपन्यांचे खोदकाम आणि पावसामुळे खड्डे पडले असून महापालिका प्रशासन हे खड्डे बुजवताना दिसत नाही. शहरातील सर्व खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला.
- 5 / 5
गणेशोत्सव मंडळाने खड्डा न बुजवल्यास त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जाते. मग कंपन्यांवर अशी कारवाई का होत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.