दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कलाकारांनी महाराष्ट्रदिनी केले श्रमदान
- 1 / 5
राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठीमधील अनेक कलाकारांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांत श्रमदान केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशी गारडगाव येथे श्रमदान करताना
- 2 / 5
अभिनेत्री स्पृहा जोशीने सिन्नरमधील धोंडबार येथे श्रमदान केलं.
- 3 / 5
पुरंदर तालुक्यात जाऊन अभिनेता मिलिंद गुणाजी यांनीदेखील श्रमदान केलं
- 4 / 5
अभिनेता पुष्कर श्रोत्रीने गारडगाव येथे श्रमदान केलं.
- 5 / 5
सई ताम्हणकर गेल्या पाच वर्षांपासून पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करत आहे. यावेळी तिने कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे श्रमदान केलं.