टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात
- 1 / 11
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)ने भारतात जानेवारी 2020 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींची यादी (टॉप 10 बेस्ट सेलर टू-व्हीलर) जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार हीरोची लोकप्रिय बाइक स्प्लेंडरवर मात करत एक नवी गाडी अव्वल ठरली आहे. एक नजर मारुया टॉप 10 सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींवर..
- 2 / 11
SIAM ने जारी केलेल्या यादीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 10 व्या क्रमांकावर हीरोची Glamour ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 318 ग्लॅमरची विक्री झाली.
- 3 / 11
नवव्या क्रमांकावर रॉयल एनफिल्डची लोकप्रिय बुलेट Classic 350 आहे. जानेवारी 2020 मध्ये 40 हजार 834 Classic 350 विकल्या गेल्या.
- 4 / 11
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये आठव्या क्रमांकावर बजाज CT ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये 42 हजार 497 बजाज CT बाइकची विक्री झाली.
- 5 / 11
सातव्या क्रमांकावर TVS XL Super आहे. 52 हजार 525 इतक्या TVS XL Super जानेवारी 2020 मध्ये विकल्या गेल्या.
- 6 / 11
SIAM ने जारी केलेल्या यादीनुसार सहाव्या क्रमांकावर Suzuki Access ही स्कुटी असून जानेवारी महिन्यात या स्कुटीच्या 54 हजार 595 युनिट्सची विक्री झाली.
- 7 / 11
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये पाचव्या क्रमांकावर होंडाची CB Shine आहे. जानेवारीमध्ये या बाइकच्या 66 हजार 832 युनिट्सची विक्री झाली.
- 8 / 11
चौथ्या क्रमांकावर बजाजची लोकप्रिय बाइक पल्सर आहे. जानेवारीमध्ये 68 हजार 354 पल्सर विकल्या गेल्या.
- 9 / 11
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा हीरोची HF Deluxe ही बाइक आहे. जानेवारी 2020 मध्ये HF Deluxe च्या 1 लाख 91 हजार 875 HF Deluxe बाइक विकल्या गेल्या.
- 10 / 11
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हीरोची सर्वाधिक लोकप्रिय Splendor ही बाइक आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात स्प्लेंडर या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 2 लाख 23 हजार 909 स्प्लेंडरची विक्री झाली होती. तर यावेळेस जानेवारीमध्ये 2 लाख 22 हजार 578 स्प्लेंडरची विक्री झाली.
- 11 / 11
सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकींमध्ये होंडाची Activa सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. जानेवारी 2020 मध्ये या लोकप्रिय स्कुटीच्या 2 लाख 34 हजार 749 इतक्या युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 2 लाख 13 हजार 302 Activa विकल्या गेल्या होत्या आणि ही स्कुटी दुसऱ्या क्रमांकावर होती. पण आता स्प्लेंडरला मागे टाकत Activa अव्वल ठरली आहे.